आशिया खंडातल्या महिला उद्योजकतेचं भवितव्य

२०३० च्या sustainable development goals मधील एक महत्वाचं उद्दिष्ट असलेल्या womens economic empowerment हे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने आशिया खंडातले सगळेच देश वाटचाल करत आहेत. महिलांचं कौशल्य फक्त घरगुती कामांमध्येच असतं, या समाजाला छेद देऊन सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये महिला पुढे येत आहेत.

आशिया खंड हे आधुनिक अर्थव्यवस्थेचं 'पॉवरहाऊस' म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंड हे आर्थिक प्रगतीचं केंद्र म्हणून उदयाला आलं आहे, ज्यात महिला उद्योजकतेचा मोठा सहभाग आहे. आर्थिक संधींमधील विषमता अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. २०२५ पर्यंत आशिया खंडाच्या जीडीपीमध्ये ४.५ ट्रिलियन डॉलर्सची भर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आशिया खंडामधील एकूण उद्योगधंद्यांपैकी ९५ टक्के उद्योग हे लघु आणि माध्यम स्वरूपाचे आहेत, ज्यांमध्ये सुमारे ९० टक्के रोजगारक्षम व्यक्ती गुंतलेल्या आहेत. २०३० च्या sustainable development goals मधील एक महत्वाचं उद्दिष्ट असलेल्या womens economic empowerment हे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने आशिया खंडातले सगळेच देश वाटचाल करत आहेत. महिलांचं कौशल्य फक्त घरगुती कामांमध्येच असतं, या समाजाला छेद देऊन सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये महिला पुढे येत आहेत. जगातल्या सुमारे साडेबारा कोटी महिला उद्योगक्षेत्रात गुंतलेल्या आहेत, ज्यांपैकी ८० लाख भारतीय आहेत. सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, कयदेविषयक अडचणींवर महिलांनी मात केली आहे. तरीसुद्धा labour force participation rate मध्ये महिलांचं प्रमाण कमी झालेलं आढळून येतं. कायदेशीरदृष्ट्या जरी महिलांना entrepreneurial right मिळालेला असला तरी अजूनही सामाजिक बंधनं आणि पुरुषप्रधान संस्कृती महिलांना या अधिकाराचा लाभ घेण्यापासून परावृत्त करते. जागतिक बँकेच्या एका अहवालात (The World Development Report 2015: Mind, Society, and Behaviour) महिलांना उद्योजकीय साहस करण्यापासून रोखणाऱ्या गोष्टींचं विस्तृत विवेचन केलं आहे. या सर्व घटकांचा विचार होऊन महिला उद्योजकतेसाठी अधिकाधिक अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करणं आवश्यक आहे. 
Mastercard Index of Women Entrepreneurs नुसार आशिया खंडातील सिंगापूर आणि फिलिपिन्स हे देश महिला उद्योजकतेच्या सर्वाधिक संधी असलेले देश आहेत. महिला उद्योजकांचं सर्वाधिक प्रमाण व्हिएतनाम देशात आहे. कोरियामध्येसुद्धा महिला उद्योजकतेचा आलेख चढता आहे. भारतातही ५८ टक्के महिला उद्योजक या २० ते ३० या वयात उद्योग सुरु केलेल्या आहेत, तर त्यातील २५ टक्के महिला या २५ वर्ष वयाच्या अगोदर उद्योग सुरु केलेल्या आहेत. एकंदरच आशिया खंडात महिला उद्योजकतेसाठी अनुकूलता वाढते आहे.

udyogvivek@gmail.com  

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.