चिंच प्रक्रिया उद्योग

चिंच हे महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळणारे असे फळ झाड आहे. चिंचेचे उत्पादन सर्वात जास्त भारतात होते. एका गावात साधारणत: १०० ते १५० चिंचेची झाडे असतात आणि एका पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सुमारे १०० ते २५० किलो चिंचा मिळतात. चिंचेचे झाडाचे आयुष्यमान हे दीर्घकाळ असते. ते १०० वर्षे असू शकते. एका जिल्ह्यातून साधारणत: २ कोटी रुपयॆ किंमतीच्या चिंचा मिळू शकतात. त्यामुळे चिंचा हे शेतकर्‍यांचे उत्पन्नाचे एक साधन आहे.

चिंचावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करून बाजारात विकली जातात. चिंच प्रक्रिया उद्योग ही एक चांगली उद्योग संकल्पना आहे. साधारणत: १० लाख ते १ कोटी रुपये भांडवलातून हा उद्योग सुरू करता येऊ शकतो. चिंचेचा गर व चिंचोके यापासून विविध उत्पादने तयार करता येतात. चिंचेचा भारतीय आहार पध्दतीमध्ये जास्त उपयोग होतो. चिंचेवर प्रक्रिया करून चिंचेची चटणी, पावडर बनवली जाते. तसेच चिंच सॉस, सरबत, चिंचेचे पन्हे ही उत्पादने देखील बनवून बाजारातविकली जातात. त्याचप्रमाणे जेली व मुरांबा ही उत्पादने देखील बनवता येतात. आजकाल अॅमेझॉन, फिल्पकार्ट यासारख्या पोर्टल्सवर ही उत्पादने पहायला मिळतात. १ किलो चिंच पावडरची किंमत साधारणत: ८०० ते १२०० रुपये असते. अख्खी चिंच ९० ते १२० रुपये प्रतिकिलोने विकली जाते. तर चिंचेच्या बियापासून गम बनवला जातो. त्याची मागणी प्लायवूड निर्मिती, पुस्तक बायडींग कारखाने तसेच कापड उद्योगात जास्त असतो. चिंचोक्यात पेक्टिन नावाचे एक द्रव्य असते. जेली,जॅम, कॅनिंग व फळप्रक्रियेमध्ये पेक्टिनचा उपयोग केला जातो. तसेच आईस्क्रीम कॉड लिव्हर ऑईल मध्येही चिंचेचा उपयोग होतो. हवाबंद टीनच्या डब्यांच्या कारखान्यात वापरण्यात येणारे पिवळे वंगण चिंचेपासून बनवलेले असते. कापड गिरण्या, ज्यूस फॅक्टरीमध्ये चिंचोक्यांना चांगली मागणी असते. चिंचेचे लाकूड देखील उच्च प्रतीचे असते. त्यापासून अनेक टिकाऊ वस्तू बनवल्या जातात. चिंचोके काढून चिंचेचा गराचे गोलाकार लाडू बनवतात. ते वर्षभर टिकतात. केरळ, कर्नाटक, तामिळनाडु या दाक्षिणात्य राज्यात चिंचेचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. चिंचेच्या श्रेणीनुसार १५ रुपये ते ४० रुपये प्रतिकिलो भावाने त्यांची विक्री केली जाते. चिंचेमध्ये औषधी गुणधर्म असल्याने अनेक औषध कंपन्या त्यांच्या बर्‍याच उत्पादनांमध्ये चिंचेचा वापर करतात.

असे हे बहुउपयोगी चिंचेचे फळ महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. त्याचे व्यवसायिक महत्व लक्षात घेतल्यास चिंच प्रक्रिया उद्योग एक चांगला पर्याय आहे. या व्यवसायासाठी शासनातर्फे सबसिडी सुध्दा देण्यात येते. ग्रामीण भागात ती ७० टक्के असते. या व्यवसायातून एकूण विक्रीच्या २५ ते ३० टक्के नफा मिळतो.

– प्रा. प्रकाश भोसले

ebrandingindia2017@gmail.com

Pro2bhosale@gmail.com

व्हॉटसअप नंबर - ९८६७८०६३९९  

(लेखक ‘ई-ब्रॅण्डिंग’ या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी तब्बल एक तप विविध बी2बी पोर्टल्स व ‘गुगल’ सर्च इंजिनसोबत काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्रभरात उद्योजकता विकासाचे काम करत आहेत.)

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.