गोमूत्र संकलन व प्रक्रिया व्यवसाय

आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रात तसेच अल्टरनेटीव्ह मेडिसीन म्हणून गोमुत्रास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गोमुत्राचा उपयोग कर्करोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, सोरायसीस यासारख्या रोगांच्या उपचार पध्दतीत गोमुत्राचा उपयोग केला जातो. तसेच सध्या ऑरगॅनिक फार्मिंगचे वारे वाहत आहे. कर्करोग, किडनीचे आजार, डिप्रेशन यासारखे विकार रासायनिक खते व पेस्टीसाईड मुळे होतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी ऑरगॅनिक फूड वापरणे गरजेचे आहे. असे आजार झाल्यावर खर्च खूप असतो. त्यामुळे त्यावर जास्त खर्च करण्यापेक्षा ऑरगॅनिक फूडवर खर्च करणे परवडणारे आहे.

ऑरगॅनिक शेती पध्दतीत गोमूत्र व त्यात कडूनिंब व तुळस यांची पाने घालून प्रक्रिया केलेले कीटकनाशक वापरणे आवश्यक असते. ते रासायनिक खतांपेक्षा जास्त स्वस्त आणि प्रभावी असते. त्यामुळे जमीन ही सुपीक होते. या व्यतिरिक्त बाजारात गोमुत्रावर आधारित इतरही उत्पादने उपलब्ध आहेत. उदा. क्लोअर क्लीनर, टुथपावडर, बाम, फेसपॅक इत्यादी उत्पादने बाजारात बर्‍यापैकी यशस्वीरित्या विकली जात आहेत, छोट्या स्केलच्या व्यवसायिकांची मासिक विक्री सुमारे १ लाख रुपये असते. आता तर ही उत्पादने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ईकॉमर्स फ्लॅफॉर्मवरही विकली जातात. त्यांना प्रचंड मागणी देखील असते. या पोर्टल्सवर गायीपासून मिळवलेली इतर उत्पादने ही विकली जातात. यात गोमुत्रापासून बनवलेल्या उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. उदा. गोमुत्रकॅप्सुल, ३० कॅप्सुल्सची किंमत साधारणत: २०० रुपये आहे.

गोमुत्र व त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांना विदेशातही पुष्कळ मागणी असते. औषध म्हणून असो किंवा फेसपॅक, फ्लोअरक्लीनर, कीटकनाशक अशा उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका, ब्रिटन, आणि अगदी अरब देशांमध्येही या उत्पादनांची मागणी वाढत आहे. ब्रिटनमध्ये ५० मिली गोमुत्राच्या बॉटलची किंमत सुमारे ३ ते ४ युरो (२६० ते ३००) रुपये असते. कर्करोगाच्या सहाव्या स्टेज मधून वाचलेल्या एका रुग्णाने गोमुत्र थेरपीचा अवलंब केला होता.

एका गाईपासून दररोज किमान ३ ते ४ लीटर गोमुत्र मिळते. स्थानिक बाजारपेठेत त्याची किंमत २० ते ४० रुपये प्रती लीटर असते. प्रक्रिया केलेल्या गोमुत्राच्या १०० मिली बाटलीची किंमत २०० रुपयांपासून सुरू होते. हा प्रकल्प उभारणीसाठी दररोज २०० ते ८०० लीटर गोमुत्र संकलित झाले पाहिजे. त्यासाठी किमान २००० स्क्वेअर फुट जागा व २ ते ३ कामगार आवश्यक आहेत. या व्यवसायासाठी अंदाजे १५ ते २० लाख रुपये भांडवलाची आवश्यकता आहे. या व्यवसायातून दरमहा अंदाजे ६० ते ८० हजार रुपये फायदा कमावता येईल.

– प्रा. प्रकाश भोसले

ebrandingindia2017@gmail.com

Pro2bhosale@gmail.com

व्हॉटसअप नंबर - ९८६७८०६३९९  

(लेखक ‘ई-ब्रॅण्डिंग’ या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी तब्बल एक तप विविध बी2बी पोर्टल्स व ‘गुगल’ सर्च इंजिनसोबत काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्रभरात उद्योजकता विकासाचे काम करत आहेत.)

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.