आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान बदलासाठी आर्चिस बिझनेस सोल्युशन्स
चांगल्या हुद्दयाची, भरगच्च पगाराची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस क्वचितच कोणी करू शकते. ठाण्यातील आर्चिस बिझनेस सोल्युशन प्रा. लि.ची सुरुवात अशाच धाडसातून झाली. कंपनीचे संचालक संजय ढवळीकर यांनी दोन तपाहून अधिक काळ बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिस आणि इन्श्युरन्स या क्षेत्रात नोकरी केली. त्यानंतर याच क्षेत्रात वेगळया प्रकारचे योगदान देणारा व्यवसाय त्यांनी सुरू केला. या व्यवसायाचे स्वरूप सांगणारी आणि त्या अनुषंगाने बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्श्युरन्स या क्षेत्रातील तंत्रज्ञान क्रांतीचा वेध घेणारी संजय ढवळीकर यांची मुलाखत.