चिंच प्रक्रिया उद्योग
चिंच हे महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळणारे असे फळ झाड आहे. चिंचेचे उत्पादन सर्वात जास्त भारतात होते. एका गावात साधारणत: १०० ते १५० चिंचेची झाडे असतात आणि एका पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सुमारे १०० ते २५० किलो चिंचा मिळतात. चिंचेचे झाडाचे आयुष्यमान हे दीर्घकाळ असते. ते १०० वर्षे असू शकते. एका जिल्ह्यातून साधारणत: २ कोटी रुपयॆ किंमतीच्या चिंचा मिळू शकतात. त्यामुळे चिंचा हे शेतकर्यांचे उत्पन्नाचे एक साधन आहे.