ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात मोठी संधी येणार

 'ऑनलाईन शिक्षण' हा भविष्यातला खूप मोठा व्यवसाय होणार आहे. त्याविषयी लिहीत आहेत प्रा. प्रकाश भोसले...

 नुकतेच ‘बायजू’ या शैक्षणिक अॅॅप बद्दल माहिती वाचली. त्याचे मूल्य आज ३.६ बिलियन डॉलर (२४ हजार कोटींचे) झाले. एका नवव्यवसायिकाने शाळेचे विषय ऑनलाईन केले. गुंतवणूकदार इतके आकर्षित झाले की, त्याची बाजारकिंमत वाढली. हीच घटना नेमकी शैक्षणिक क्षेत्रात मोठी ई-कॉमर्स क्रांती येण्याची संकेत देते. आता कोणत्याही शाळा, कॉलेजशिवाय जगभरातील कोणत्याही विद्यापीठाचे शिक्षण शक्य होईल. जगातील अनेक देश MBBS चे शिक्षण केवळ १० लाख रुपयांत, MBA केवळ १५ हजारात देण्याच्या तयारीत आहेत. या क्षेत्रात टेक्नॉलॉजीचा वापर करून इमारत, शिक्षण, परीक्षा यावरचा खर्च प्रचंड कमी होत आहे. आज ज्या शिक्षण सम्राटांच्या टोलेजंग इमारती आहेत, त्या पुढील १० वर्षांत भंगारात निघतील. छोट्या छोट्या फ्रॅन्चायजी घेऊन लोक गलोगल्ली जगभरातील कोणतेही शिक्षण केवळ एक लॅपटॉप व प्रोजेक्टरवर देतील. जसा ई-कॉमर्सनी बलाढ्य मॉलचा खेळ संपवला तसे ‘बायजू’ सारखे अॅप शिक्षण सम्राटांचा खेळ संपवतील. शाळा कॉलेजला मुलंच मिळणार नाहीत. सुमारे ६ लाख बी.एड. पदवीधरांना कोणतीच नोकरी मिळणार नाही. कारण आहेत त्याच शाळा धडाधड बंद पडतील. जिकडे तिकडे एज्युकेशन अॅपच्या फ्रंचायजी म्हणजेच केवळ इन्स्ट्रक्टर, प्रवेश परीक्षा केंद्रे असतील. मोबाईल, लॅपटॉप, प्रोजेक्टर हेच शिक्षणाचे साधन असेल. खडू-फळा इतिहासात जमा होईल. ज्यांनी कोणी शाळा, कॉलेजच्या धंद्यात गुंतवणूक केली असेल, त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन मोड्यूलकडे वळून पर्यायी नव्या तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण क्षेत्राकडे वळावे.   

– प्रा. प्रकाश भोसले

ebrandingindia2017@gmail.com

Pro2bhosale@gmail.com

व्हॉटसअप नंबर - ९८६७८०६३९९  

(लेखक ‘ई-ब्रॅण्डिंग’ या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी तब्बल एक तप विविध बी2बी पोर्टल्स व ‘गुगल’ सर्च इंजिनसोबत काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्रभरात उद्योजकता विकासाचे काम करत आहेत.)

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.