शेअर बाजारात तेजीने आठवड्याला निरोप

नवी दिल्ली : जी-२० परिषद आणि शी जिंगपिंग यांची बैठक यामुळे दबावात असणारे शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक शेवटच्या सत्रात वधारले. आठवड्याच्या शेवटी रुपयाची मजबूती आणि कच्च्या तेलाच्या दरांतील घसरण यांमुळे दोन्ही निर्देशांकांत वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४ अंशांनी वधारत ३६ हजार १९४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८ अंशांनी वधारत १० हजार ८७६ वर बंद झाला.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १५१ अंश तर निफ्टी ३५ अंशांनी वधारला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये तेजी दिसून आली. बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स ०.१६ टक्के वधारत १४ हजार ३७५ वर पोहोचला. निफ्टीच्या मंचावर आयटी शेअरमध्ये ०.६४ टक्के, ऑटो इंडेक्समध्ये ०.६३ टक्के, एफएमसीजी इंडेक्स ०.६३ टक्क्यांनी तर फार्मा इंडेक्समध्ये १ टक्क्यांनी वाढ झाली.

गुरुवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी रुपया मजबूत झाल्याने बाजार सावरण्यास मदत झाली. शुक्रवारी रुपया १७ पैशांच्या मजबूतीसह वधारत ६९.६७ च्या स्तरावर कामगिरी करत होता. दरम्यान, गुरुवारी रुपया ७८ पैशांनी मजबूत झाला होता.

- प्रतिनिधी, महा एमटीबी

udyogvivek@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.