समभगातून समृद्धीकडे : टेक्निकल चार्ट

अनेक शेअर ट्रेडर्सकडून आपण ‘टेक्निकल चार्ट’ हा शब्द कायम ऐकत असतो. तसा हा शब्द जडशीलच वाटतो आणि हे प्रकरण खूप काहीतरी कठीण आहे, असा विचार करून आपण त्याच्या वाटेस जात नाही. म्हणून आज आपण त्याबद्दलच थोडी माहिती घेऊया. गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स वापरले जातात. आपली कामाची पद्धत आणि अपेक्षित माहिती याप्रमाणे आपण आपल्याला हवा तो चार्ट वापरायचा असतो. या चार्ट प्रकारांमध्ये लाइन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, पॉईंट-अँड-फिगर चार्ट, हेकिनअसी, इचिमुकू क्लाऊड, कागी चार्ट्स, रेन्को चार्टस इत्यादी चार्ट समाविष्ट आहेत.