ग्रामीण भागांत दर्जेदार वस्तूंचे उत्पादन होणे आवश्यक: स्नेहल लोंढे

"ग्रामीण भागांत उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी येईल अशा दर्जेदार वस्तूचं उत्पादन होणं आवश्यक आहे,''असे उद्गार उद्योजिका पूर्वा पेंढारकर यांनी 'विवेक उद्योगस्वामिनी' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना काढले. 
अनुभवांतून उत्तीर्ण होणे हीच यशाची पायरी: पूर्वा पेंढारकर
''एक उद्योजक म्हणून प्रवास करताना चांगल्या-वाईट अनुभवांतून उत्तीर्ण होऊन आपण पुढे-पुढे जात असतो आणि तीच आपल्या यशाची एक एक पायरी असते,'' असे उद्गार उद्योजिका पूर्वा पेंढारकर यांनी 'विवेक उद्योगस्वामिनी' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना काढले. 
बचतगटापासून पर्यावरणापर्यंत...
सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी नाशिकमधील सिंहस्थात कापडी पिशव्या वाटपाची चळवळ पुढे आली. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुकही झाले. या उपक्रमामागे मेहनत होती ती दीपाली कुलथे यांची.
''महिलांना व्यवसायवृध्दीची संधी''- अशिष कुमार चौहान
सरकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांमधून अधिकाधिक उद्योजक पुढे यावेत, यासाठी एक समाजमन तयार होण्याची गरज आहे. यासाठी बाँबे स्टॉक एक्स्चेंज पुढाकार घेत आहे. मार्गदर्शपर बऱ्याच गोष्टी बाँबे स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून होत आहे. त्याचा लाभ महिलांना होईल, हा विश्वास बाँबे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान यांनी व्यक्त केला.
'विवेक उद्योगस्वामिनी' उपक्रमाचे दिमाखदार उदघाटन
'विवेक समूह'चा भाग असलेल्या 'उद्योगविवेक' या संकेतस्थळांतर्गत महिला उद्योजकांना एक हक्काचे व्यासपीठ म्हणून सुरु करण्यात आलेल्या 'विवेक उद्योगस्वामिनी' या नवीन उपक्रमाचा उदघाटन समारंभ शनिवार दि. १६ मार्च रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज येथे दिमाखात पार पडला. बॉम्बे स्टोक एक्स्चेंज चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशिषकुमार चौहान आणि 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'च्या उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. 
विवेक उद्योगस्वामिनी : महिलांनी महिलांसाठी महिलांकडून चालवलेलं उद्योगपीठ
दि. ८ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जात असला तरी, त्याचं औचित्य साधून संपूर्ण मार्च महिनाच महिलांसाठीच्या काही ना काही कार्यक्रमांनी भरलेला असतो. यावर्षी महिला दिनाचं औचित्य साधून ‘विवेक समूह’महिला उद्योजकांसाठी ‘विवेक उद्योगस्वामिनी’ हा एक अभिनव उपक्रम घेऊन आला आहे.  शनिवार दि. १६ मार्च रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथे दुपारी ३ ते ६ या वेळात या उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या महिला उद्योजकांचा असा हा एक आनंदमेळाच आहे.
'सर्जना'ची उद्योजकता
'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळयावाचुनि झुलायचे।' प्रत्येक स्त्रीला तिचे स्वत्व उमगले की, तिच्या स्वप्नांना जणू आकाश ठेंगणे होते. स्वत:तल्या सर्जनशीलतेने स्त्री अधिकाधिक उमलत जाते. भवताल सुगंधित करते आणि तो दरवळ चहूबाजूंना पसरतो. अनेक घरांना बहर देतो. माझ्या बाबतीत असेच झाले. माझे छोटेसे जन्मगाव कोठूर, राहुरी आणि नाशिक या तिठयापलीकडे कधीच न गेलेली मी आता व्यवसाय, प्रशिक्षणांच्या निमित्ताने भरपूर फिरते. 'मिरर' फाउंडेशनच्या निमित्ताने खेडयातली एक सामान्य मुलगी ते एक यशस्वी उद्योजिका हा माझा प्रवास अनेकांच्या साथीने आणि माझ्यातल्या इच्छाशक्तीने सुंदर केलाय. पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्स 'चारू' या ब्रँडखाली बाजारात आणण्याची संकल्पना सुचली, ती प्रत्यक्षात आली आणि उद्योजक म्हणून मला ओळख मिळाली.