राष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) २०१९ 

केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) - २०१९ नुकतेच जाहिर केले आहे. रबर लागवड आणि रबरी वस्तूंच्या उत्पादनाला चालना देणे, रबर उद्योगाची पर्यावरणपूरकता जपणे आणि वाढवणे रबरी वस्तूंच्या निर्यातीला चालना देणे अशी उद्दिष्टे ठेवून हे धोरण तयार करण्यात आले आहे. 
राष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) २०१९ 
केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय रबर धोरण (National Rubber Policy) - २०१९ नुकतेच जाहिर केले आहे. रबर लागवड आणि रबरी वस्तूंच्या उत्पादनाला चालना देणे, रबर उद्योगाची पर्यावरणपूरकता जपणे आणि वाढवणे रबरी वस्तूंच्या निर्यातीला चालना देणे अशी उद्दिष्टे ठेवून हे धोरण तयार करण्यात आले आहे. 
'टाटा स्टील' महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार
२०२५ पर्यंत 'टाटा स्टील' कंपनी महिला कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करून ती १० टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याची बातमी मंगळवारी कंपनीच्या सूत्रांनी दिली. टाटा स्टील कंपनीत सध्या ३५ हजार कर्मचारी कार्यरत असून त्यांपैकी १७५० महिला कर्मचारी आहेत. म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे ५ टक्के आहेत. हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी आवश्यक ते तांत्रिक आणि उत्पादनाचे प्रशिक्षण महिला कर्मचाऱ्यांना देण्याचीही कंपनीची योजना आहे. 
कॉफीच्या पाच भारतीय जातींना 'जीआय' टॅग 
कॉफीच्या पाच भारतीय जातींना भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून  'जीआय' (Geographical Indication - GI)  टॅग मिळाला आहे. यामध्ये कर्नाटकातल्या कोडगू जिल्यात उत्पादन होणाऱ्या Coorg Arabica, केरळातल्या वेनाड जिल्ह्यातली Wayanaad Robusta, कर्नाटकातील चिकमंगळूर येथे उत्पादन होणारी Chikmagalur Arabica आणि Bababudangiris Arabica  आंध्रप्रदेश आणि उडिसाच्या डोंगराळ भागांत उत्पादन होणारी Araku Valley Arabica या पाच कॉफीच्या जातींचा समावेश आहे.
ट्रिनि'टी'
भारतातल्या छोट्या चहा उत्पादकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ट्रिनिटी (Trinitea ) नावाचा एक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. येत्या ४ एप्रिल रोजी कोलकाता येथे या कार्यक्रमाचे उदघाटन होईल. नेदरलँडची कंपनी 'सॉलिडॅरिदाद' आणि 'इंडियन टी असोसिएशन' यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जाणार आहे. छोट्या चहा उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांशी जोडून देणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. छोट्या चहा उत्पादकांना हवामानविषयक माहिती, माती परीक्षण, खते आणि कीटकनाशक व्यवस्थापन इ. बाबतीत आवश्यक त्या सेवा पुरवल्या जाणार आहेत.
व्हॉटसअॅप बिझनेस चीफ निरज अरोरा यांचा राजीनामा
सॅन फ्रान्सिसको : सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅपच्या चीफ बिझनेस ऑफिसर नीरज अरोरा यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारी त्यांनी ही घोषणा केली. ‘मला माझ्या परिवारासाठी वेळ द्यायचा असल्याने मी हा निर्णय घेतला आहे’, असे त्यांनी सांगितले. अरोरा २०११मध्ये गुगलमधून व्हॉटसअॅप इनकॉर्पोरेशनमध्ये रुजू झाले होते. फेसबूकने २०१४ साली १९ अब्ज डॉलर्सना व्हॉटसअॅपची खरेदी केली होती. या करारामध्ये अरोरा यांची प्रमुख भूमिका होती. आयआयटी दिल्ली आणि इंडियन स्कुल ऑफ बिझनेसमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
शेअर बाजारात तेजीने आठवड्याला निरोप
नवी दिल्ली : जी-२० परिषद आणि शी जिंगपिंग यांची बैठक यामुळे दबावात असणारे शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक शेवटच्या सत्रात वधारले. आठवड्याच्या शेवटी रुपयाची मजबूती आणि कच्च्या तेलाच्या दरांतील घसरण यांमुळे दोन्ही निर्देशांकांत वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४ अंशांनी वधारत ३६ हजार १९४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८ अंशांनी वधारत १० हजार ८७६ वर बंद झाला.