साखर उद्योगाला शाश्वत पर्यायाची गरज
सध्याची परिस्थिती एका उलटया अर्थाने साखर उद्योगाला अतिशय पोषक अशी आहे. साखरेचे भाव पडलेले आहेत आणि पेट्रोलचे भाव प्रचंड चढले आहेत. केवळ एक साधी तांत्रिक दुरुस्ती केली, तर हे सगळे कारखाने साखर कारखाने न राहता इथेनॉल निर्मिती कारखाने बनतात. यामुळे तयार होणाऱ्या उत्पादनाला दसपट भाव जास्त मिळू शकतो.